Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गुरुजी - नंदू, हुंडा म्हणजे काय सांग रे जरा…
नंदू - जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या स्त्रीला आयुष्यभर सहन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो,
तेव्हा त्याला प्रोत्साहन भत्ता किंवा अनुदान म्हणून जी रक्कम दिली जाते,
त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा म्हणतात…
नंदूला आदर्श विद्यार्थी पुरस्कार जाहीर झाला!
…
नवरा आणि बायको दोघेही अपघातात वारले…
नवरा भूत बनला आणि बायको चेटकीण
काही दिवसांनंतर दोघे पुन्हा भेटले
बायको - किती वेगळे वाटता भूत बनल्यानंतर…
नवरा - पण तू अजिबात बदलली नाहीस…
…
प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं…
पोट भरून खायला पाहिजे, पण…
जाड नाय झाली पाहिजे…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)