Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
!! हार्दिक आमंत्रण !!
३१ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता घरी एक कार्यक्रम ठेवला आहे, तुम्ही सर्वांना नक्की यायचं आहे.
कार्यक्रमात
चिकन हंडी, चिकन मसाला
चिकन बिरयानी, मटन बिर्याणी
मटण मसाला, मटण हंडी
बटर चिकन, चिकन 65
मटण टिक्का
कोल्ड्रिंक, रम
व्हिस्की, बियर
चिकन तंदुरी
स्प्रिंग रोल
आईस्क्रीम
.
.
.
.
.
.
यापासून होणाऱ्या आजारांविषयी माहिती देण्यात येईल व तुळशी माळ घालण्याचे फायदे सांगण्यात येतील
धन्यवाद… राम कृष्ण हरी
मुंबई मेट्रोतून प्रवास करत होतो…
बाजूला एक मुलगी उभी होती…
अचानक तिनं मोबाइलवर राष्ट्रगीताची धून वाजवली…
मी अदबीनं उभा राहिलो, तेवढ्यात ती बसली!
चेटकिणीनं माझ्याशी राजकारण केलं!
एक सूक्ष्म निरीक्षण
घराच्या भिंतीला मारलेला रंग वर्षानुवर्षे राहील की नाही, पण
रंगाची बादली पुढची १० वर्षे आंघोळ करायला कामाला येते…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)