Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक मुलगा आणि मुलगी हॉटेलात गेले…
वेटर - मॅडम, काय पाहिजे तुम्हाला?
मुलगी - ती भाजीवाली भाकरी द्या…
वेटर गोंधळला…
मुलगा - गावावरून आले. पिझ्झा पाहिजे तिला…
वेटरनं कपाळावर हात मारला!
…
इंजिनीअरिंगचा फॉर्म भरणाऱ्या एका मुलानं तिथं असलेल्या वॉचमनला विचारलं,
कसं आहे हे कॉलेज?
वॉचमन म्हणाला, खूप जबरदस्त कॉलेज आहे…
मी पण इथूनच इंजिनीअरिंग केलंय!
…
मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरतो!
मुलाकडचे मुलीच्या घरी जातात…
पोहे होईपर्यंत विचारपूस सुरू होते!
मुलाकडचे लोक विचारतात, मुलीनं काय केलंय!
मुलीचे बाबा - जगणं मुश्किल केलंय. एकदाची घेऊन जा!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या