Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
आनंदी जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत…
तुम्हाला माहीत झाले की आम्हालाही सांगा!
जन्मठेपेची शिक्षा भोगून १४ वर्षांनी तो घरी परतला…
खूप थकला होता. कपडे मळकटलेले होते…
घरात येताच बायको ओरडली!
कुठं होता तुम्ही एवढा वेळ. तुमची सुटका दोन तासांपूर्वीच झाली होती ना?
दुसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा गुन्हा केला आणि जेलमध्ये गेला!
जे समजायचं ते समजा…
लग्न एवढंही उशिरा करू नका की…
मेंहदी हातावर लावण्याऐवजी केसांना लावावी लागेल!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या