Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायकोनं पार्लरमध्ये जाण्यासाठी दोन हजार मागितले.
नवऱ्यानं मोठ्या मनानं पाच हजार दिले आणि म्हणाला,
दोन हजारानं काही होणार नाही…
संध्याकाळी नवऱ्याचा चेहरा सुजलेला होता.
बायकोनं त्याला का मारलं कळलंच नाही!
…
आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा,
आपलं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या पाठीशी उभे राहतात
तुमचा विश्वास बसत नसेल
तर तुमच्या लग्नाचा अल्बम काढून बघा!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)