Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बंड्या - रोज दुपारी तीन तास माझे विश्रांतीचे असतात.
पिंट्या - अच्छा म्हणजे रोज दुपारी तीन तास तू झोपतोस
बंड्या - नाही. माझी बायको झोपते.
…
संता परदेशात जाऊन पुन्हा भारतात आला.
घरी आल्यावर बायकोला म्हणाला, मी परदेशी बाबू सारखा दिसतोय का?
बायको - नाही.
संता - मग लंडनमध्ये एक बाई मला विदेशी का म्हणत होती?
…
नवरा - आतापर्यंतच्या अनुभवावरून मला कळलंय की
मूर्ख लोकांना सुंदर बायको मिळते.
बायको - तुम्हाला तर माझं कौतुक करण्याशिवाय दुसरं कामच नाही.
नवरा बेशुद्ध
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)