Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायकोनं नवऱ्याला फोन केला!
ऑफिसमधून येताना भाजी घेऊन या… आणि हो ती नीलम तुम्हाला विचारत होती.
नवरा - कोण नीलम?
बायको - कोणी नाही. तुम्ही मेसेज वाचावा म्हणून मुद्दाम टाकलं.
नवरा - तेच म्हटलं. नीलम तर माझ्यासोबत आहे. मग तुझ्यासोबत कोण आहे?
बायको - कोण नीलम? कुठे आहात तुम्ही? आत्ताच्या आत्ता सांगा.
नवरा - मी बाजारातच आहे
बायको - तिथंच थांबा. मी लगेच येते
बाजारात पोहोचल्यानंतर बायको पुन्हा फोन करते.
बायको - कुठे आहात?
नवरा - मी ऑफिसमध्ये आहे. आता बाजारात आलीच आहेस तर भाजी घेऊन जा.
मोठ्ठी आली मला नीलमची भीती दाखवणारी.
…
पुरुष नेहमी अशा स्त्रीवर प्रेम करतो, जी त्याची प्रत्येक गोष्ट कान लावून ऐकते…
आणि त्याचं लग्न अशा बाईबरोबर होतं, जी त्याचं काडीचं ऐकत नाही.
…
नवरा-बायको दोघे मार्केटमध्ये गेले होते…
तेवढ्यात एका मुलीनं नवऱ्याला हाय-हॅलो केलं…
बायको - कोण होती ती?
नवरा - जाऊ दे ना. माझं डोकं फिरवू नको.
मला अजून तिलाही सांगायचंय की तू कोण आहेस?
बायको मार्केटमध्येच बेशुद्ध…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या