Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा थकूनभागून घरी येतो आणि बायकोकडं पाणी मागतो.
बायको - खूप तहान लागली का?
बायकोचा हा प्रश्न ऐकून नवऱ्याची सटकते…
नवरा - नाही, तहान नाही लागली.
गळा चेक करायचा आहे. बघायचंय कुठं लीकेज तर नाही ना!
…
बायको - अहो ऐकलंत का?
नवरा - (खेचण्याच्या मूडमध्ये) दुसरा पर्याय काय आहे?
बायको - माझं वय ४८ झालं तरी तुमचा एक मित्र माझ्या सौंदर्याचं कौतुक करत होता.
नवरा - मुश्ताकभाई असेल.
बायको - तुम्हाला कसं कळलं?
नवरा - त्याचा रद्दीचा धंदा आहे.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या