Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा - सकाळी डोळे उघडले की मी देवाकडं प्रार्थना करतो,
माझ्यासारखी बायको सगळ्यांना मिळो…
बायको - (खूष होऊन) खरंच सांगताय!
नवरा - हो. यात काहीच खोटं नाही.
कारण, मी एकट्यानंच का दु:ख भोगायचं?
बायको लाटणं घेऊन मागे लागते…
…
बायको - मी चार-पाच दिवस तुम्हाला दिसले नाहीतर कसं वाटेल?
नवरा - खूपच चांगलं वाटेल
नंतर चार दिवस खरोखरच त्याला बायको दिसली नाही.
पाचव्या दिवशी डोळ्यांची सूज कमी झाली तेव्हा कुठं समोरचं दिसायला लागलं!
काय समजलात?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या