मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : लग्नाचा नेमका अर्थ काय? घ्या जाणून…

Joke of the day : लग्नाचा नेमका अर्थ काय? घ्या जाणून…

HT Marathi Desk HT Marathi
Nov 11, 2023 08:11 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

ट्रेंडिंग न्यूज

लग्नाचा नेमका अर्थ काय?

लग्न ही एक अशी युती असते...

जिथं दोन व्यक्ती मिळून आयुष्यभर त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात,

ज्या त्यांच्या लग्नाआधी अस्तित्वातच नसतात!

...

घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असते. आरोपी नवरा न्यायाधीशांसमोर गरीब गायीसारखा उभा असतो...

न्यायाधीश - तू १० वर्षांपासून तुझ्या बायकोला मारून-मुटकून धाकात ठेवलेयस हे खरं आहे का?

आरोपी नवरा - साहेब, त्याचं असं आहे की...

न्यायाधीश - मला स्पष्टीकरण नको! हे सगळं कसं जमवलंस तेवढंच सांग...

आरोपी काय समजायचं ते समजला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel