Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मुलगी - तू काय करतोस?
मुलगा - मी डास मारतोय
मुलगी : किती मारले?
मुले - ५ मारले. ३ महिला आणि २ पुरुष
मुलगी - पुरुष की स्त्री हे तू कसं ओळखलंस?
मुलगा - ३ आरशाजवळ बसले होते आणि २ बिअरच्या बॉक्सजवळ बसले होते.
...
आजीला गीता वाचताना पाहून नातवानं त्याच्या आईला विचारलं…
आई, आजी कोणत्या परीक्षेची तयारी करत आहेत?
आई: बेटा, ती तिच्या शेवटच्या वर्षाची तयारी करत आहे.
…
हवालदार : घटनास्थळावरून पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाला फोन करतो…
हवालदार : साहेब, इथं एका बाईनं तिच्या नवऱ्यावर गोळी झाडलीय
पोलीस निरीक्षक : का?
हवालदार : तिनं पुसलेली लादी सुकली नसतानाच तिचा नवरा त्यावरून चालत होता
पोलीस निरीक्षक : तिला अटक केली का!
हवालदार : नाही सर, लादी अजून ओलीच आहे.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)