Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक माणूस वकील झाला. त्याला पहिली केस मिळाली...
आरोपी - वकील साहेब, जन्मठेप झाली तरी चालेल, पण फाशी होणार नाही एवढं बघा
वकील - तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना!
सुनावणीनंतर वकील बाहेर आला
पत्रकार - काय झालं?
वकील - मोठ्या कष्टानं जन्मठेप मिळवून दिलीय. नाहीतर जज त्याची सुटकाच करणार होते.
...
एका रात्री सांताक्लॉज पिंट्याला भेटायला आणि म्हणाला, तुझी एखादी इच्छा सांग...
पिंट्या म्हणाला, माझी बायको खूप भांडणं करते. एखादी दुसरी बायको मिळवून दे
सांताक्लॉजनं पिंट्याला तुडव तुडव तुडवला
नंतर कळलं की पिंट्याची बायकोच सांताक्लॉज बनून आली होती
सावध राहा, सतर्क राहा...
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)