Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बाई तिसऱ्यांदा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मुलाखत द्यायला गेल्या
तिसऱ्या वेळी सुद्धा आरटीओ अधिकाऱ्यानं तोच प्रश्न विचारला...
अधिकारी - मॅडम, एका बाजूला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या बाजूला भाऊ आहे, तर तुम्ही काय माराल?
बाई - नवऱ्याला
अधिकारी - मॅडम, तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ब्रेक मारावा लागेल.
...
कम्युटर इंजिनीअरिंग करणाऱ्या एका मुलीची एक मुलगा रोज छेड काढायचा...
एक दिवस ती संतापली आणि म्हणाली,
अरे ए पेन ड्राइव्हच्या झाकणा, Virus च्या पोरा, Excel ची करप्ट फाइल,
असं Click करेन की जमिनीवरून Delete होऊन स्मशानात Install होशील
समजलास का?
त्या मुलानं पुन्हा आयुष्यात तिची छेड काढली नाही!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)