मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Marathi Jokes, Marathi Short Jokes, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : बायकोचं नाव घेताच जेव्हा आरोपी निर्दोष सुटतो…

Viral Marathi jokes
Viral Marathi jokes
HT Marathi Desk • HT Marathi
Sep 19, 2023 10:04 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
Sep 19, 2023 10:04 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

एक घरमालक भाडेकरूला घर दाखवत असतो…

घरमालक - तुम्हाला ७०० रुपये भाडं द्यावं लागेल

भाडेकरू - पण तुमच्या घरात सगळीकडं उंदीर नाचताना दिसतायत

घरमालक - मग ७०० रुपयांत तुम्हाला काय माधुरी आणि श्रीदेवीचा नाच दाखवू का?

मुलगा - माझ्याशी लग्न करशील का?

मुलगी - नाही, मी कुणाशीही लग्न करणार नाही

मुलगा - अच्छा, तुझं वजन किती आहे?

मुलगी - लग्नाचा आणि वजनाचा काय संबंध?

मुलगा - लग्नाला तयार झाली नाहीस तर तुला उचलून न्यायला

न्यायाधीश - अपघात झाला तेव्हा तुम्ही कार हळू चालवत होता याचा पुरावा काय?

आरोपी - न्यायाधीश साहेब, मी माझ्या बायकोला आणायला सासुरवाडीला जात होतो…

न्यायाधीशांचे डोळे भरून आले, त्यांनी क्षणाचाही विचार न करता आरोपीला जामीन दिला…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)