Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बस खचाखच भरून चाललेली असते. काही लोक उभे असतात...
एक तरुणी - (तरुणाला) मला बसायला सीट दे ना...
तरुण - मी का म्हणून देऊ? ही लेडिज सीट नाही
तरुणी - एक मुलगी उभी आहे, तू सीट देऊ शकत नाहीस का?
तरुण - माझ्या लग्न करशील?
तरुणी - का म्हणून?
तरुण - एक मुलगा बिन लग्नाचा आहे. तू लग्न सुद्धा करू शकत नाहीस?
मुलीनं त्यानंतरच संपूर्ण प्रवास उभ्यानंच केला...
...
एक मुलगी पिझ्झाच्या आउटलेटमध्ये गेली आणि तिनं पिझ्झा ऑर्डर केला
पिझ्झा देताना काऊंटरवरच्या पोऱ्यानं विचारलं...
मॅडम, पिझ्झाचे ४ तुकडे करू की ८ करू?
मुलगी - नको चारच कर, आठ खाल्ले तर जाड होईन!
...
एक इसम गुलाबजाम घेण्यासाठी दुकानात जातो. तिथं दुकानदाराचा मुलगा खेळत असतो...
गिऱ्हाईक - अरे तुझ्या बाबांचं तर मिठाईचं दुकान आहे, तुला रोज गुलाबजाम मिळत असतील ना
मुलगा - काय सांगू काका, मला खूप खावेसे वाटतात, पण बाबा मोजून गुलाबजाम ठेवतात. म्हणून मग मी फक्त चोखून परत बाटलीत ठेवतो...
गिऱ्हाईक बेशुद्ध
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या