Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
ह्याला म्हणतात कवी!
ना तलवार की धार से…
ना बंदूक की नळी से…
बंदा डरता है तो बस
उन्हाच्या झळी से
…
लोकांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे
तू ऊठ बरं इथून
…
डॉक्टर - घाबरू नका देशपांडे, छोटं ऑपरेशन आहे
पेशंट - थँक यू डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही!
डॉक्टर - मला माहीत आहे… देशपांडे माझं नाव आहे!
(पेशंट जीव खाऊन पळाला)
…
तो - तू सांगितलं नाही की तुझ्या अंगात देवी येते म्हणून
ती - काय?
तो - तुझा केस विस्कटलेला फोटो व्हॉट्सअॅपला पाहिला
ती - नालायका, आंघोळ केल्यानंतर काढलेला सेल्फी आहे तो…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या