मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Marathi Jokes, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोसाठी प्रेमानं जेवण बनवतो…

Viral Jokes
Viral Jokes
HT Marathi Desk • HT Marathi
May 27, 2023 09:45 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
May 27, 2023 09:45 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

आज चक्क नवऱ्यानं जेवण बनवून बायकोला वाढलं. स्वारी भलतीच खूष होती.

बायको : तुम्ही बनवलेल्या भाजीचे नाव काय आहे हो?

नवरा : असं का विचारतेयस?

बायको : काही नाही हो, देवाघरी गेल्यावर तिथं विचारतील ना, काय खाऊन मेलीस म्हणून?… तिथं सांगायला पाहिजे ना!

...

बायको : मी तुम्हाला सोडून गेले, तर तुम्ही काय कराल?

नवरा : असं काही बोलू नकोस, हा विचारही मला सहन होत नाही! तुझ्या विरहात मी वेडा होईन

बायको : तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना?

नवरा : वेड्या माणसाचा काय भरवसा? तो काहीही करू शकतो

त्या दिवशी नवऱ्याला उपवास करावा लागला…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel