मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : तुमच्यातील दोष शोधून काढण्याचा जालीम मार्ग

Joke of the day : तुमच्यातील दोष शोधून काढण्याचा जालीम मार्ग

HT Marathi Desk HT Marathi
Dec 08, 2023 09:53 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral marathi jokes
Viral marathi jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

एक गृहस्थ आपल्या मित्रांना सांगत होते,

मी गेल्या ४० वर्षांपासून गीता संदेश ऐकत आलो आहे…

सर्व मित्रांचा त्यांच्या प्रती आदर वाढला. 

सगळे मित्र त्यांच्याकडं एक ज्ञानी पुरुष म्हणून बघू लागले…

काही दिवसांनी कळलं की…

त्यांच्या बायकोचं नाव गीता आहे! 

एक तरुण मोठ्या महाराजांच्या प्रवचनाला जातो…

प्रवचन झाल्यावर प्रश्नोत्तरं सुरू होतात…

तरुण - महाराज, आपल्यामध्ये काय कमी आहे ते कसं शोधायचं?

महाराज - बाळा, लग्न करणं हा त्यावर उपाय आहे!

तरुण - पण त्यानं काय होणार महाराज?

महाराज - तुझी बायको फक्त तुझ्यामध्येच काय कमी आहे हे सांगणार नाही, तुझ्या आख्ख्या भावकीमध्ये काही कमी आहे हे पहिल्या सहा महिन्यात सांगेल!

याला म्हणतात सिद्ध पुरुष

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel