Joke of the day : वडील जेव्हा मुलाला दारू सोडायचा सल्ला देतात…
Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!
Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ट्रेंडिंग न्यूज
बंड्या नेहमीप्रमाणे दारू ढोसून घरी येतो. वडिलांच्या ते लक्षात येतं. ते शांतपणे त्याला सांगतात…
बाबा : बाळा, दारू पीत जाऊ नको.
बंड्या : का बाबा? दारू पिणं वाईट असतं का?
बाबा : तसं नाही रे… आपल्या घरची परिस्थिती फार चांगली नाही. पैशा-पाण्याची तंगी असते. दोघंही दारू प्यायलो तर घर बरबाद होईल.
बंड्याची एका झटक्यात उतरली…
…
प्रियकर-प्रेयसी गप्पा मारत असतात…
प्रियकर : तुला माझ्यातली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली?
प्रेयसी : वेळ बदलली की लोक बदललात? पण तू नाही बदललास. तू अजूनही तस्साच्या तस्सा आहेस.
प्रियकर : म्हणजे कसा?
प्रेयसी : मी जेव्हा पहिल्यांदा तुला भेटले तेव्हाही तू बेरोजगार होतास, आजही तू बेरोजगारच आहेस…
हे ऐकून प्रियकर बेशुद्धच झाला…
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
विभाग