मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Jokes In Marathi, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : नवरा झोपेत बडबड करत असेल तर करा हा घरगुती उपाय

Viral Jokes
Viral Jokes
HT Marathi Desk • HT Marathi
May 31, 2023 09:28 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
May 31, 2023 09:28 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

एक बाई डॉक्टरांकडे जाते…

बाई : डॉक्टर साहेब, माझा नवरा झोपेत बडबड करतो. मला खूप त्रास होतो. काहीतरी उपचार करा…

डॉक्टर : यावर माझ्याकडं उपचार नाही. तुम्हाला घरगुती उपचार करावा लागेल

बाई : नेमकं काय करावं लागेल?

डॉक्टर : त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या.

बाईंनी डॉक्टरकडं न बघताच काढता पाय घेतला…

पत्रकार ८० वर्षांच्या एका वयोवृद्ध सेलिब्रिटीची मुलाखत घेत असतो…

पत्रकार : वयाच्या ८० व्या वर्षीही तुम्ही तुमच्या बायकोला डार्लिंग म्हणून बोलावता… या प्रेमाचं रहस्य काय?

सेलिब्रिटी : कसलं डोंबलाचं रहस्य? वय झाल्यामुळं मला काही गोष्टी आठवत नाहीत. मी बायकोचं नाव विसरलोय. हे सांगायची हिंमत होत नाही, म्हणून डार्लिंग म्हणतो…

पत्रकारानं सेलिब्रिटी आजोबांचे पाय धरले…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel