मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : प्रियकर जेव्हा प्रेयसीला लग्नासाठी नकार देतो…
Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

Joke of the day : प्रियकर जेव्हा प्रेयसीला लग्नासाठी नकार देतो…

26 May 2023, 10:08 ISTHT Marathi Desk

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

प्रियकर : (अत्यंत गंभीरपणे) मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.

प्रेयसी : पण का?

प्रियकर : माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नाला विरोध आहे. 

प्रेयसी : नेमका कोणाचा विरोध आहे?

प्रियकर : माझी बायको आणि दोन मुलांचा…

तिनं त्याला चपलीनं हाणला…

बायको : तुम्ही रोज फेसबुकवर रोमँटिक कविता लिहिता की 'ये तेरी जुल्फें है जैसे रेशम की डोर'…

हे तुम्ही कोणासाठी लिहिता?

नवरा : लाडके, मी हे फक्त तुझ्यासाठीच लिहितोय

बायको : मग तीच 'रेशम की डोर' जेवणात सापडली तर आरडा-ओरडा कशाला करता?

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग