मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मुला-मुलीचा बघण्याचा कार्यक्रम असतो…

Joke of the day : मुला-मुलीचा बघण्याचा कार्यक्रम असतो…

HT Marathi Desk HT Marathi
May 20, 2023 09:40 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

मुला-मुलीचा बघण्याचा कार्यक्रम असतो. दोघांना एकांतात बोलायला दिलं जातं. संवाद सुरू होतो…

मुलगी : मी माझ्या बाबांची परी आहे

मुलगा : अरे वा, छान! मी माझ्या बाबांचा पारा आहे

मुलगी : (दचकून) पारा? हा काय प्रकार आहे?

मुलगा : मला बघताच माझ्या बाबांचा पारा चढतो…

मुलगा जोमात, मुलगी कोमात…

गिऱ्हाईक : अरे वा, तुमचं हॉटेल जबराट आहे. ऑर्डर देताच डाळ फ्राय हजर… एवढ्या लवकर कसं जमतं?

वेटर : ग्राहक दहा मिनिटांच्या वर मेन्यू कार्ड चाळत बसला की आम्ही समजून जातो की हा काय मागवू शकतो!

वेटरचं हे उत्तर ऐकून गिऱ्हाईकाचा डाळ फ्रायसारखा करपला…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग