मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायकोच्या घरी जेवण केल्यानंतर नवरा तिला विचारतो की…

Joke of the day : बायकोच्या घरी जेवण केल्यानंतर नवरा तिला विचारतो की…

HT Marathi Desk HT Marathi
May 17, 2023 10:43 AM IST

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Viral Marathi jokes
Viral Marathi jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

 

सासुरवाडीला गेलेला नवरा जेवून उठतो आणि हळूच बायकोला विचारतो...

नवरा : आज जेवण सासूबाईंनी बनवलं होतं का?

बायको : (खूश होऊन) अरे व्वा, तुम्ही कसं ओळखलंत?

नवरा : तू करतेस तेव्हा काळे केस मिळतात, आज पांढरा केस मिळाला...

बायको विषय बदलून पळ काढतो!

...

बंड्या वडिलांना विचारतो...

बाबा, साडू म्हणजे काय?

वडील : बाळा, जेव्हा दोन माणसं एकाच कंपनीकडून फसवल जातात, तेव्हा त्यांना साडू म्हणतात!

बंड्याची मम्मी चुकून हे संभाषण ऐकते. पुढं काय होतं हे सांगायची गरज आहे?

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग