मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Jokes In Marathi, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : गुरुजी जेव्हा मुलांना संघटनेचं महत्त्व विचारतात…

Viral Jokes in Marathi
Viral Jokes in Marathi
HT Marathi Desk • HT Marathi
May 16, 2023 06:00 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
May 16, 2023 06:00 AM IST

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

ट्रेंडिंग न्यूज

 

गुरुजी जेव्हा मुलांना संघटनेचं महत्त्व विचारतात…

गुरुजी : संघटनेत शक्ती असते याचं एक उत्तम उदाहरण द्या

बंड्या : गुरुजी, खिशात एक विडी असली तर सहज तुटते, पण विडीचा बंडल असला तर तुटत नाही

गुरुजींनी बंड्याला दम लागेपर्यंत मारला...

बायकोनं एकदा नवऱ्याला विचारलं...

बरं मला सांगा, आपल्या दोघांमध्ये मूर्ख कोण आहे, तुम्ही की मी?

नवरा (शांतपणे) चहाचा घोट घेताना म्हणाला… लाडके, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की तू खूप कुशाग्र बुद्धीची आहेस. त्यामुळं तू एखाद्या मूर्ख माणसाशी लग्न करशील असं होऊच शकत नाही!

नवऱ्याच्या या उत्तरावर बायको इतकी खूश झाली की विचारूच नका...

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel