Joke of the day : संत्याला जेव्हा जंगलात चेटकीण भेटते…
Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!
ट्रेंडिंग न्यूज
संत्या एकदा रानातील वाटेनं घराकडं येत होता...
मध्येच त्याला एका चेटकिणीनं अडवलं
जोरजोरात किंचाळत आणि विकट हसत ती म्हणाली
हा हा हा मी चेटकीण आहे...
संत्या वैतागून म्हणाला, हो बाई मला माहीत आहे.
तुझी एक बहीण माझ्या घरात आहे.
संत्या कुणाबद्दल बोलला असेल हे सांगायला पाहिजे का?
...
चोर पकडण्याच्या मशिनचा शोध लागला आणि त्याचे परिणाम दिसू लागले...
अमेरिकेत एका दिवसात ९ चोर पकडले गेले
चीनमध्ये ३०, जपानमध्ये ९० आणि पाकिस्तानात १०० चोर जाळ्यात अडकले...
भारतात थोडी वेगळी घटना घडली
एका तासात मशिनच चोरीला गेली!
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
विभाग