मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Jokes In Marathi, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : चिंटूचा मित्र जेव्हा त्याच्या घरी खेळायला येतो…

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes
HT Marathi Desk • HT Marathi
May 12, 2023 10:32 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
May 12, 2023 10:32 AM IST

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

मViral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

ट्रेंडिंग न्यूज

 

चिंटू : आई सगळी खेळणी पलंगाखाली लपवून ठेव...

चिंटूची आई : का रे बाळा?

चिंटू : माझा मित्र डब्बू आपल्या घरी खेळायला येतोय.

चिंटूची आई : डब्बू खेळणी चोरतो का?

चिंटू : नाही गं आई, त्याची खेळणी ओळखेल ना तो.

आईनं कपाळाला हात मारला…

गुरुजी : मुलांनो, भारतातील एका महान शास्त्रज्ञाचं नाव सांगा बघू

पप्पू : गुरुजी, आलिया भट्ट

गुरुजी (भडकून पप्पूच्या दिशेनं जातात, हेच शिकवलं का मी तुला?)

गुरुजी पप्पूला रट्टा देणार तोच दुसरा विद्यार्थी बोलतो

गुरुजी, तो बोबडा आहे. त्याला आर्यभट्ट म्हणायचं होतं.

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel