Vidya Balan Weight Loss: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेते. सध्या ही अभिनेत्री तिच्या आगामी 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. पण सध्या ती आपल्या कमी झालेल्या वजनामुळेही चर्चेत आहे. या लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या ४५ व्या वर्षी प्रचंड प्रमाणात वजन कमी केले आहे. आणि अलीकडेच तिने वजन कमी करण्याचे सीक्रेटदेखील सांगितले आहे. चला, जाणून घेऊया कोणत्या ट्रिक्सने अभिनेत्रीने तिचे वजन कमी केले आहे.
गलाटा इंडियाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वजन कमी करण्याबद्दल सांगितले. विद्या बालनने सांगितले की, तिने स्लिम होण्यासाठी खूप मेहनत केली. यासाठी तिने डायटिंग आणि भरपूर व्यायामही केला. त्यामुळे तिचे वजन कधी-कधी कमी व्हायचे, पण काही दिवसांतच तिचे वजन पुन्हा वाढू लागायचे. सततच्या वाढत्या वजनाने ती त्रस्त झाली होती.
अभिनेत्रीने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला तिने स्वतःच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले. खरं तर, या वर्षी ती वजन कमी करण्यासाठी चेन्नईतील पोषणतज्ञांच्या ग्रुपमध्ये सामील झाली. जिथे तिला चरबीसोबत वाढण्यासोबतच शरीरात सूज येण्याचीही माहिती मिळाली. मग या सूजला तोंड देण्यासाठी तिने आपला आहार बदलला. या वेळी तिला समजले की पालक आणि दुधी भोपळ्यासारख्या निरोगी दिसणाऱ्या भाज्या देखील तिच्यासाठी वाईट ठरू शकतात.
वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने यावर्षी तिच्या आहारात बदल केला आहे. यासोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्याने तिने व्यायाम पूर्णपणे बंद केला. अभिनेत्रीने सांगितले की, हे पहिले वर्ष आहे जेव्हा तिने वर्कआउट केले नाही. पण त्याचे परिणाम खूप चांगले आले आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, लोकांनी तिचे वजन कमी झालेले नोटीससुद्धा केले आहे.
विद्या बालन ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. विद्या कोणत्याही मोठ्या अभिनेत्याशिवाय आपल्या चित्रपटांना हिट करून दाखवते. विद्याने अभिनेत्री केंद्रित भूमिका साकारून बॉलिवूडमधील एक प्रथा मोडीत काढली आहे. गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीने शेरनी, जलसा, नियत, शकुंतला देवी, दो और दो प्यार अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. सध्या अभिनेत्री 'भूल भुलैय्या ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या