Social Media: रोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ असे असतात जे व्हायरल होतात. यातले काही व्हिडीओ वेगळंच अटेन्शन घेतात. असाच एक नुकताच एक इंस्टाग्राम व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ एक असामान्य गोष्ट दर्शवितो. यामध्ये असं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की चिकनचे तुकडे एका फेरी व्हीलच्या राइड्सच्या पट्ट्यावर बांधलेले आहेत. त्यावर चिकन बांधून हळूहळू उघड्या ज्वालांवर शिजवत असताना दिसत आहे.
व्हिडीओला, "चिकन फेअर" असे कॅप्शन दिलेले आहे. मनोरंजन पार्कची मजा आणि कुकिंग या विचित्र कॉम्बिनेशनचे चित्रण या व्हिडीओमध्ये दिसते. या व्हिडीओवर ऑनलाइन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींना ही संकल्पना वैचित्र्यपूर्ण वाटली, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. व्हिडीओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वादविवादाला सुरुवात केली, वापरकर्त्यांनी या कुकिंग स्टाईलवर विविध मते व्यक्त केली.
सोशल मीडियावर या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना ही कल्पना आवडली, तर काहींना असे वाटले की चिकन शिजवण्यासाठी हि कुकिंग स्टाईल छान आहे.
एका वापरकर्त्याने कमेंट केली, "तुझी हिंमत कशी झाली असं काही शिजवण्याची आणि तेही माझ्या ठिकाणापासून खूप दूर.... मी तिकडे खायला जाऊ शकत नाही भाऊ..." दुसरा युजर कमेंट करतो की, "विनर विनर चिकन डिनर." "कुकआउट किंवा कार्निव्हल," तिसरी कमेंट. " हास्यास्पद. खरच खूप निर्दयी थीम," एका वापरकर्त्याने कमेंट केली, तर दुसऱ्याने त्यावरच ऍड केले की, " वाईट वाटते... शाकाहारी असल्याचा अभिमान आहे. तुम्ही त्यांना खाऊन कसा आनंद घ्याल तुम्ही त्यांचा जीव मारला आणि तुम्ही त्याचा आनंद घेत आहात! मला आशा आहे की तुला नरकात कर्म मिळेल."
फेरी व्हीलवर चिकन भाजतांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २४.१ दशलक्ष व्हुज मिळेल आहेत. ४३१ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. याशिवाय २ हजारांहून अधीक कमेंट्स केल्या आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या