मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: चक्क १० मिनिटांत तयार होते तूप, तुम्ही ट्राय केली का ही व्हायरल रेसिपी?

Viral Video: चक्क १० मिनिटांत तयार होते तूप, तुम्ही ट्राय केली का ही व्हायरल रेसिपी?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2024 01:37 PM IST

Ghee Recipe Video: घरी केवळ १० मिनिटांत तूप बनवण्याच्या रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याला २८ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युव मिळाले असून सकारात्मक आणि नकारात्मक कमेंट मिळाल्या आहेत.

१० मिनिटात तूप बनवण्याचा व्हायरल व्हिडिओ
१० मिनिटात तूप बनवण्याचा व्हायरल व्हिडिओ

10 Minutes Ghee Recipe Video: अनेक महिलांना घरी तूप बनवणे हे कष्टाचे आणि वेळखाऊ प्रक्रिया वाटते. जर तुम्हाला सुद्धा असेच वाटत असेल तर हा व्हायरल व्हिडिओ तुमची मदत करेल. या व्हिडिओतील रेसिपी फॉलो करून तुम्ही १० मिनिटात तूप बनवू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलंत! सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया देत ही एक 'छान ट्रिक' असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यांची 'सर्वात मोठी समस्या' सुटली आहे. तर काहींनी सांगितले की त्यांनी रेसिपी ट्राय केली आणि ती 'चांगली झाली नाही'. तर अनेकांनी ही रेसिपी ट्राय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिप्रा केसरवानीन यांनी इन्स्टाग्रामवर ही रेसिपी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "कुकरमध्ये तूप बनवा (how to make ghee in cooker)." व्हिडिओमध्ये एक महिला प्रेशर कुकरमध्ये दुधाची साय (क्रीम) टाकताना दिसत आहे. पुढे त्यात ती पाणी घालते आणि झाकण लावते. शिट्टी वाजली की ती झाकण उघडते. नंतर बेकिंग सोडा घालते आणि हे मिश्रण आणखी काही मिनिटे ढवळते. शेवटी ती मिश्रण गाळून त्यातील तूप एका कंटेनरमध्ये टाकते. हा व्हिडिओ १७ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. शेअर केल्यापासून त्याला २८ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे.

अनेकांनी या व्हिडिओ पाहिला असून त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक विचार मांडले आहे. यावर एका व्यक्तीने व्हिडिओ छान असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्याने चांगली ट्रिक असल्याचे म्हटले आहे. तर एकाने ट्राय करणार असल्याचे सांगितले. एका युजरने सगळ्यात मोठी समस्या सोडवल्याचे सांगितले. तर एका व्यक्तीने ही ट्रिक काम करत नसून सर्व गडबड झाली आहे, अशी कमेंट केली. याला पुष्टी देत दुसऱ्या दोन युजरने सुद्धा प्रयत्न केले पण फसले, चुकूनही हे करू नका अशी कमेंट केली आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel