Protein Rich Diet: शरीर चालण्यासाठी अनेक प्रकारच्या न्युट्रियन्टसची गरज असते. यातलं एक म्हणजे प्रोटीन. शरीरात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर दिसू लागतात. शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी प्रोटीन फार महत्त्वाचे आहे. प्रोटीनचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते, हाडे मजबूत होतात, मेटॅबॉलिझम क्रिया चांगली राहते, खराब झालेले टिश्यू दुरुस्त होतात. प्रोटीनचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे अंडी आणि चिकन. नॉनव्हेज खाणारे लोक हे खातात. पण शाकाहारी लोक हे पदार्थ खाऊ शकत नाही. पण असे काही पदार्थ आहेत जे शाकाहारी आहेत आणि ते प्रोटीनची कमतरता भरून काढू शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला प्रोटीनची कमतरता कधीच सहन करावी लागणार नाही. चला या पदार्थांविषयी जाणून घेऊयात.
> दुधात फक्त कॅल्शियमच नाही तर प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते. दुधामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात, त्यामुळे प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिणे चांगले असते.
> अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारखे सुका मेवा सुद्धा प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. यामध्ये हाय कॅलरीज देखील आहेत, म्हणून याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
> कडधान्यांचे सेवनही करावे. प्रथिनांसह डाळींमध्ये फायबर, फोलेट, मँगनीज आणि लोह देखील असते.
> चिया सीड्स फार ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे शरीराला प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळतात. तुम्ही सकाळी दह्यासोबत खाऊ शकता किंवा स्मूदी बनवू शकता.
> हिरवे वाटाणे देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. हे हिरवे वाटाणे सलाड, सूप किंवा साइड डिश म्हणून खाऊ शकतात.
> पीनट बटर हे आजच्या तरुणाईला फार आवडते. याचे सेवन केल्याने शरीराला प्रथिनेही चांगल्या प्रमाणात मिळतात.
> सोया मिल्क आणि टोफू सारख्या सोया उत्पादनांचे सेवन केल्याने शरीराला प्रथिनांचे प्रमाण चांगले मिळते. प्रथिनांसह, टोफू व्हिटॅमिन के, फायबर आणि फोलेटचा देखील चांगला स्रोत आहे.
> किडनी बीन्स आणि ब्लॅक बीन्स सारख्या बीन्स प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. चणे खाल्ल्याने शरीराला प्रथिनेही मिळतात. याशिवाय ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.
> राजगिरा आणि क्विनोआ हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. हे ग्लूटेन मुक्त धान्य आहेत आणि ते खूप आरोग्यदायी देखील आहेत.
> ओट्स आणि ओट्स दोन्ही शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने देतात. यापासून शरीराला फायबरही चांगल्या प्रमाणात मिळतं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)