Veg Soup Recipe: पावसाळयात बनवा गरमागरम व्हेज सूप! चवीसोबत देणार विविध फायदे! आजार राहणार दूर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Veg Soup Recipe: पावसाळयात बनवा गरमागरम व्हेज सूप! चवीसोबत देणार विविध फायदे! आजार राहणार दूर

Veg Soup Recipe: पावसाळयात बनवा गरमागरम व्हेज सूप! चवीसोबत देणार विविध फायदे! आजार राहणार दूर

Updated Jul 30, 2024 02:32 PM IST

Veg Soup Recipe In Marathi: पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात गरमागरम पदार्थ खाणे याची मज्जा काही वेगळीच असते. पावसाळ्यात गरमागरम सूप पिणेदेखील अनेक लोकांना प्रचंड आवडते.

Healthy Soup Recipe: व्हेज सूपची रेसिपी
Healthy Soup Recipe: व्हेज सूपची रेसिपी (Freepik)

Veg Soup Recipe In Marathi: पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. पावसाळ्यात ट्रिप, ट्रेकिंग अशा विविध गोष्टी करायला लोकांना आवडतं. शिवाय पावसाळ्यात आणखी एक गोष्ट करणे सर्वांनाच पसंत असते. ती म्हणजे विविध खाद्यपदार्थ खाणे. पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात गरमागरम पदार्थ खाणे याची मज्जा काही वेगळीच असते. पावसाळ्यात गरमागरम सूप पिणेदेखील अनेक लोकांना प्रचंड आवडते. खासकरून हे सूप चवदार आणि आरोग्यदायी असेल तर ते घरी बनवणे नक्कीच लाभदायक आहे. तसे पाहायला गेले तर जेव्हा तुम्ही बाजारातून झटपट बनणारे सूप विकत आणता आणि बनवता तेव्हा ते तुमच्या आरोग्याला फायदा देण्याऐवजी याउलट नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे तुम्ही घरातच सूप बनवणे उत्तम आहे.

पावसाळ्यात असे अनेक प्रकारचे सूप पिता येतात. मात्र आज आपण अशा सूपची रेसिपी जाणून घेणार आहोत. जो चांगली चव देण्यासोबतच तुमच्या आरोग्याला विविध प्रकारचे फायदेही देईल. आज आपण एक व्हेज सूपची रेसिपी पाहणार आहोत. हा सूप पावसाळ्यात तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवेल. शिवाय तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवेल. शिवाय हा सूप व्हेज असल्याने पचनास अत्यंत हलका आणि तुम्हाला ऊर्जा देणारा असेल.

  • व्हेज सूपसाठी लागणारे साहित्य-

गाजर: एक चमचा (तुकडे करून)

कांदा: एक चमचा (बारीक चिरून)

कॉर्न: एक चमचा

सिमला मिरची: एक टीस्पून (बारीक चिरून)

हिरवा कांदा: एक टीस्पून (बारीक चिरून)

ऑलिव्ह ऑईल: एक ते दोन चमचे

मशरूम(आवडीनुसार): १ ते २, (बारीक चिरून)

लसूण: 1 टीस्पून (बारीक चिरून)

आले: अर्धा टीस्पून (बारीक चिरून)

एक लिटर पाणी

मीठ: चवीनुसार

काळी मिरी: क्रश करून

 

  • व्हेज सूप बनवण्याची रेसिपी -

व्हेज सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिरलेला लसूण आणि आले प्रत्येकी एक चमचा घाला. नंतर त्यात अत्यंत काळजीपूर्वक एक लिटर पाणी घाला. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कॉर्न, सिमला मिरची, गाजर, मशरूम किंवा तुमच्या आवडत्या भाज्या घाला. चवीनुसार मीठ घालून सूप उकळू द्या. पाणी एक इंच कमी होईपर्यंत ते उकळत राहा.

थोडे पाणी आटवून त्यात नंतर काळी मिरी घाला. त्यानंतर एका भांड्यात दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण सूपमध्ये ओता आणि चमच्याने ढवळत राहा. हळूहळू सूप काहीसा घट्ट होईल. अशाप्रकारे तुमचे चविष्ट सूप तयार करून सर्व्ह करा.

 

Whats_app_banner