मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vat Purnima Makeup Tips: वट पौर्णिमेला तयार होताना लक्षात ठेवा या मेकअप टिप्स! दिसाल सुंदर

Vat Purnima Makeup Tips: वट पौर्णिमेला तयार होताना लक्षात ठेवा या मेकअप टिप्स! दिसाल सुंदर

Jun 19, 2024 12:15 PM IST

Beauty Tips: वट पौर्णिमा जवळ आली आहे. सणाला तयार होताना महिलांना मेकअप खराब होऊ नये म्हणून या काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे.

वट पौर्णिमेसाठी मेकअप टिप्स
वट पौर्णिमेसाठी मेकअप टिप्स (freepik)

Makeup Tips for Vat Purnima: वट सावित्री व्रत विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि माता सावित्रीची कथा ऐकतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच वैवाहिक जीवन सुखी होते. या दिवशी महिला सुंदर तयार होऊन पूजा करतात. पण या उन्हामुळे जेव्हा चेहऱ्यावर केलेला मेकअप घामामुळे खराब होऊ लागतो तेव्हा फक्त लूकच नाही तर मूड सुद्धा खराब होतो. जर तुमच्यासोबत दरवर्षी असं होत असेल तर यावर्षी वट सावित्री पूजेला फ्रेश आणि फ्लॉलेस दिसण्यासाठी या मेकअप टिप्स फॉलो करा.

वट पौर्णिमेसाठी मेकअप टिप्स

मेकअपच्या आधी तयार केला चेहरा

मेकअप करण्यापूर्वी सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यानंतर कोणतेही मेकअप प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर सर्वप्रथम ते त्वचेत चांगले शोषले जाण्याची वाट पहा.

ट्रेंडिंग न्यूज

मेकअपचा करा कमीत कमी वापर

उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावरील मेकअप अनेकदा घामाने वाहू लागतो. अशावेळी ही समस्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर जाड लेयर मेकअप आणि ग्रीसी स्किन केअर प्रॉडक्ट्स लावणे टाळा. चांगल्या मेकअपसाठी नेहमी क्लिंजर, सीरम, जेल बेस्ड मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.

प्राइमर स्किप करू नका

मेकअपची सुरुवात चेहऱ्यावर चांगला प्राइमर लावून करावी. एक चांगला प्राइमर चेहऱ्याची उघडी छिद्रे बंद करून मेकअप बराच काळ सेट ठेवण्यास मदत करतो. उन्हाळ्यासाठी वॉटरप्रूफ ऑईल फ्री प्राइमर वापरा.

सेटिंग पावडर

उन्हाळ्यात बराच वेळ मेकअप सेट ठेवण्यासाठी सेटिंग पावडर महत्त्वाची भूमिका बजावते. याचा वापर तुम्ही चेहऱ्याच्या जास्त ऑइली भागावर जसे टी-झोन, हनुवटी आणि गाल यावर केला पाहिजे. मेकअपनंतर ही पावडर चेहऱ्यावर ३० सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

सेटिंग स्प्रे

उन्हाळ्यात मेकअप घामापासून वाचवायचे असेल तर सेटिंग स्प्रे लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. हे न लावल्यास घामामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे सेटिंग स्प्रे चुकवू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel