Vat Purnima 2024: वट पौर्णिमेला चेहऱ्यावर हवा असेल ग्लो तर ट्राय करा हे फेस पॅक, बनवणे आहे सोपे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vat Purnima 2024: वट पौर्णिमेला चेहऱ्यावर हवा असेल ग्लो तर ट्राय करा हे फेस पॅक, बनवणे आहे सोपे

Vat Purnima 2024: वट पौर्णिमेला चेहऱ्यावर हवा असेल ग्लो तर ट्राय करा हे फेस पॅक, बनवणे आहे सोपे

Jun 17, 2024 08:05 PM IST

Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा टॅन आणि निस्तेज होते. या वट पौर्णिमेला ग्लोइंन स्किन हवी असेल तर हे ३ प्रकारचे फेस पॅक वापरा.

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी फेस पॅक
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Face Pack for Glowing and Fresh Skin: उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा खूप खराब होते. हे घाम आणि उन्हामुळे होते. कडक ऊन आणि घामामुळे चेहऱ्याची चमक हरवून जाते. ही चमक कायम ठेवण्यासाठी स्किन केअरमध्ये घरगुती फेस पॅकचा समावेश करा. काही दिवसात वट पौर्णिमेचा सण येणार आहे. यासाठी महिलांची तयारी सुरु झाली आहे. तुम्हालाही वट पौर्णिमेला ग्लोइंग स्किन हवी असेल तर तुम्ही हे ३ प्रकारचे फेस पॅक ट्राय करू शकता. हे तुमच्या चेहऱ्याचे ग्लो वाढवतील. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे हे फेस पॅक.

केसर एलोवेरा फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक

आहे -

- केशर

- एलोवेरा

फेस पॅक कसे बनवावे

हे बनवण्यासाठी एलोवेरा जेलचे पान घ्या आणि चांगले धुवा. मग त्याची बाजू कापून मध्यभागी उघडून जेल बाहेर काढा. जर तुम्हाला ताजी कोरफड मिळत नसेल तर तुम्ही बाजारातून आणलेले एलोवेरा जेलही वापरू शकता. आता २-३ चमचे एलोवेरा जेलमध्ये ५-६ केशरचे धागे मिसळून काही तास फ्रिजमध्ये ठेवावे. नंतर स्वच्छ चेहऱ्यावर कोल्ड फेस पॅक लावा. ३० मिनिटे ठेवा आणि मसाज करताना धुवून टाका.

बटाटा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- १ छोटा बटाटा

- १ चमचा मध

- १ चमचा दही किंवा दूध

कसे बनवावे फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी बटाट्याचे साल काढून घ्या. नंतर बटाट्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये टाकून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत ब्लेंड करा. बटाट्याची पेस्ट एका बाऊलमध्ये टाका. त्यात मध, दही किंवा दूध घाला. सर्व काही चांगले मिक्स करा आणि नंतर क्लिंजरने चेहरा धुवा आणि कोरडे करा. आता बटाट्याचा मास्क डोळ्यांना टाळून चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. साधारण १५-२० मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावा.

मसूर डाळ फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- मसूर डाळ

- दूध

- तांदळाचे पीठ

- मुलतानी माती

कसे बनवावे फेस पॅक

हे पॅक बनवण्यासाठी डाळ दुधात टाकून थोडा वेळ भिजू द्या. नंतर ते चांगले मिक्स करा. आता त्यात तांदळाचे पीठ आणि मुलतानी माती घाला. चांगली घट्ट पेस्ट तयार झाल्यानंतर स्वच्छ चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५-२० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. शेवटी मॉइश्चरायझर लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner