मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Varun Dhawan: टॅनिंग काढण्यासाठी वरून धवनची हटके ट्रिक! बघा Video
varun dhavan skin care
varun dhavan skin care (varundvn / Instagram )

Varun Dhawan: टॅनिंग काढण्यासाठी वरून धवनची हटके ट्रिक! बघा Video

25 May 2023, 13:13 ISTTejashree Tanaji Gaikwad

Tanning: उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या फार कॉमन आहे. यामुळे त्वचेचे नुकसान होते. हे टॉनिक काढण्यासाठी तुम्हाला बाहेरच्या क्रीम वापरण्याची गरज नाही. तुम्ही घरची टॉनिक दूर करू शकता.

Skin Care: उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या शाररिक, त्वचेच्या समस्या जाणवतात. उन्हाळ्यात घाम येणे किंवा इतर समस्या आपल्याला त्रास देतात. कडक गरमीसह उन्हाची दहशतही वाढली आहे. सूर्यकिरणांमुळे त्वचेचे नुकसान होते आणि त्वचा काली पडू लागते. या समस्येला टॅनिंग म्हणतात. टॅनिंग झाले कि त्याला काढणे तसे सोप्पे नसते. उन्हाळ्याच्या या कहरामुळे वरुण धवनही हैराण झाला आहे. त्यालाही टॅनिंगची समस्या जाणवत आहे. यावर त्याने एक सोप्पा उपाय शोधून काढला आहे. तो त्याने सगळ्यांसोबत शेअरही केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वरुण धवन सध्या सिटाडेल या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे त्यांना त्वचेवर टॅनिंगचा सामना करावा लागत आहे. वरुण धवनच्या हाताला टॅनिंग झाले आहे आणि तो स्वतः सोशल मीडियावर त्याचा उल्लेख करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवनने हातात बर्फाने भरलेले भांडे घेतले आहे. यानंतर तो बर्फाच्या पाण्याने भरलेल्या बादलीत पाय ठेवताना दिसत आहे. यासोबत त्याने 'Dirty tan+Ice+recovery' असे कॅप्शन दिले आहे. चला या त्वचेची काळजी घेण्याच्या उपायाबद्दल जाणून घेऊयात…

बर्फाने काढा टॅनिंग

बर्फाचे थंड करणारे घटक त्वचेच्या आत खोलवर जाऊन टॅन काढून टाकण्यास मदत करतात. ही पद्धत खूप जुनी आहे आणि यासाठी कोणताही खर्च करायची गरज नाही. जर तुम्हाला पायांचे टॅनिंग काढायचे असेल तर एका बादलीत बर्फ घ्या आणि मग त्यात पाय काही मिनिटे ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या हातांचे टॅनिंग देखील काढू शकता.

चेहऱ्यावरही करू शकता ट्राय

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ही पद्धत वापरायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. बर्फ थेट चेहऱ्यावर लावण्याऐवजी कापडात ठेवून चेहऱ्याला चोळा. टॅनिंग टाळण्यासाठी तुम्ही इतर घरगुती उपायांचा अवलंब करू शकता, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. हे आपल्या त्वचेला सूर्यकिरण आणि अतिनील किरणांपासून वाचवण्याचे काम करते.

विभाग