Valentine Week List: रोझ डे पासून प्रॉमिस डेपर्यंत, जाणून घ्या लव्ह वीकमधील प्रत्येक दिवसाबद्दल-valentines week full list 2024 from rose day to promise day know about all days of love week ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine Week List: रोझ डे पासून प्रॉमिस डेपर्यंत, जाणून घ्या लव्ह वीकमधील प्रत्येक दिवसाबद्दल

Valentine Week List: रोझ डे पासून प्रॉमिस डेपर्यंत, जाणून घ्या लव्ह वीकमधील प्रत्येक दिवसाबद्दल

Feb 07, 2024 09:26 AM IST

Valentin's Day: व्हॅलेंटाईन वीक अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सण १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेने संपतो. जाणून घ्या या लव्ह वीकमधील प्रत्येक दिवसाबद्दल.

व्हॅलेंटाईन वीक
व्हॅलेंटाईन वीक (unsplash)

Valentine's Week Full List 2024: व्हॅलेंटाईन वीक जवळ आला आहे आणि लोक गिफ्ट, सरप्राइज आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवून प्रेमाचा महिना साजरा करण्याची तयारी करत आहेत. पार्टनर, प्रेमात पडलेले लोक किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला विचारण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहणारे लोक या खास दिवसांची वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला येतो. पण प्रेमाच्या महिन्याची उत्कंठा पहिल्या आठवड्यात सुरू होते आणि ७ फेब्रुवारीपासून प्रेमाचा आठवडा विविध दिवसांनी साजरा केला जातो. या लव्ह वीकमध्ये रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे हे दिवस साजरे केले जातात.

व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस लव्हर्ससाठी महत्वाचा असतो, जो ते रोमँटिक डेटवर जाऊन, आपल्या जोडीदाराचे आवडते पदार्थ बनवून, एकमेकांच्या छंदाचा आनंद घेऊन, सरप्राईज प्लॅन करून साजरा करतात. १४ फेब्रुवारी किंवा प्रेमाच्या दिवसाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित असले तरी व्हॅलेंटाईन वीकचे सात दिवस आपल्या जोडीदारासोबत कसे साजरे करावे हे देखील माहित असले पाहिजे.

व्हॅलेंटाईन वीक २०२४ च्या तारखा आणि महत्त्व

७ फेब्रुवारी - रोझ डे (Rose Day)

रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आज व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. या दिवशी कपल्स गुलाबाचे फुल देतात किंवा आपल्या प्रियजनांना बुके पाठवतात. लोक सामान्यत: या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाब भेट देतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाच्या फुलांचा बुके देऊन सरप्राइज द्या. या दिवशी गुलाबाच्या विविध रंगांना विशेष अर्थ आहे. जसे लाल म्हणजे प्रेम, पिवळा म्हणजे मैत्री, गुलाबी म्हणजे कौतुक असते.

८ फेब्रुवारी - प्रपोज डे (Propose Day)

प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस आहे. नावाप्रमाणेच लोकांसाठी त्यांच्या भावनांची कबुली देण्याचा किंवा त्यांच्या लव्हर्सला प्रपोज करण्याचा हा दिवस आहे.

९ फेब्रुवारी - चॉकलेट डे (Chocolate Day)

चॉकलेट डे हा तिसरा दिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला, क्रशला किंवा प्रेयसीला चॉकलेट गिफ्ट करतात. काही जण हाताने बनवलेली चॉकलेट्स देखील गिफ्ट करतात. जर आपल्या प्रिय व्यक्तीला गोड आवडत नसेल तर आपण त्यांना भेट म्हणून त्यांचा आवडता स्नॅक देऊ शकता.

१० फेब्रुवारी - टेडी डे (Teddy Day)

व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे १० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. प्रेमात पडलेले लोक या दिवशी आपल्या जोडीदाराला टेडी बिअर भेट देऊन सरप्राइज देतात. असे म्हणतात की क्युट खेळणे आपल्या जोडीदाराला तणाव कमी करण्यास किंवा त्यांची चिंता विसरण्यास मदत करेल.

११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे (Promise Day)

प्रॉमिस डे ११ फेब्रुवारीला आहे. हा व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस असतो. प्रॉमिस डेच्या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम करण्याची आणि त्यांची काळजी घेण्याचे, त्यांचे नाते दृढ करण्याची, चीअरलीडर बनण्याची आणि कठीण परिस्थितीत पाठिंबा देण्याची वचने देतात.

१२ फेब्रुवारी - हग डे (Hug Day)

हग डे हा व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस असून १२ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मिठी मारणे हा एक प्रेमळ गेस्चर आहे आणि जेव्हा एखाद्याला ते आपल्या प्रियजनांकडून मिळते तेव्हा ते त्यांच्या मनातील सर्व चिंता दूर करण्यास मदत करते. जेव्हा भाषा आपल्या खऱ्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरते तेव्हा शारीरिक आपुलकी आश्चर्यकारकपणे कार्य करते.

१३ फेब्रुवारी - किस डे (Kiss Day)

व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी किस डे साजरा केला जातो. तो १३ फेब्रुवारीला येतो. प्रेमात पडलेले लोक या दिवशी चुंबनाने आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करतात किंवा प्रेमाच्या या कृतीने आपल्या जोडीदाराबद्दल आपुलकी दर्शवतात.

१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentines Day)

अखेर व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. तो १४ फेब्रुवारीला येतो. डेटवर बाहेर जाणे, गिफ्ट देणे, एकमेकांसाठी रोमँटिक गेस्चर, एकत्र दर्जेदार वेळ घालविणे, हाताने बनवलेल्या भेटवस्तू किंवा सरप्राईज देणे आणि बरेच काही करून कपल्स हा विशेष प्रसंग साजरा करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग