Rose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व-valentines day why we celebrate first rose day in valentines week know the history and significance ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Rose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Feb 06, 2024 06:06 PM IST

Valentine's Week: आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाची मदत घेणाऱ्या अनेकांना रोझ डे का साजरा केला जातो हे माहीत नसेल. जाणून घ्या रोझ डेचा इतिहास आणि महत्त्व.

व्हॅलेंटाईन वीक - रोझ डेचा इतिहास आणि महत्त्व
व्हॅलेंटाईन वीक - रोझ डेचा इतिहास आणि महत्त्व (unsplash)

History and Significance of Rose Day: प्रेमात असलेल्या प्रत्येक कपल्स, लव्हर्ससाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. प्रेमी कपल्सच्या विशेष आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे असतो तर शेवटचा व्हॅलेंटाईन डे असतो. प्रेमाचा हा आठवडा ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी असतो. ज्यामध्ये कपल्स आपल्या जोडीदारांना गुलाब, टेडी आणि चॉकलेट देऊन एकमेकांशी त्यांच्या भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने होते. या लव्ह बर्ड्स त्यांच्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची मदत घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाची मदत घेणाऱ्या अनेक लोकांना रोझ डे का साजरा केला जातो हे माहीत नाही. तुम्हालाही माहीत नसेल तर जाणून घ्या रोझ डेचा इतिहास आणि महत्त्व.

कधी साजरा केला जातो रोझ डे? (when Rose Day celebrated)

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने होते. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी कपल्स त्यांच्या पार्टनरला गुलाबाचे फूल देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात.

का साजरा केला जातो रोझ डे? (Why Rose Day Celebrated)

गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लोक त्यांच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून एकमेकांना गुलाबाचे फूल देतात. रोझ डेच्या दिवशी आपल्या आवडीच्या किंवा प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फूल किंवा पुष्पगुच्छ दिला जातो.

रोझ डेचा इतिहास (Rose Day History)

रोझ डेच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर असे म्हटले जाते की मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाब खूप आवडत होते. नूरजहाँला खूश करण्यासाठी जहांगीर रोज एक टन ताजे लाल गुलाब तिच्या राजवाड्यात पाठवत असे. त्यांची ही प्रेमकहाणी लोकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली.

 

तर रोझ डे संदर्भात दुसरी कथा राणी व्हिक्टोरियाच्या काळातील आहे. जेव्हा लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाब देत असत. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग