Dos and Donts for Lipsticks: जर तुम्हीही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने डेटवर जाण्याची तयारी करत असाल तर आधी या काही मेकअपच्या टिप्स लक्षात ठेवा. हे तुमचा लुक खास बनवण्यात मदत करतील. अनेकदा मुलींना त्यांच्या कपड्याच्या रंगाशी योग्य लिपस्टिकचा कलर मॅच करता येत नाही. त्यामुळे लूक तितकासा आकर्षक दिसत नाही. जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेला आकर्षक आणि सुंदर दिसायचं असेल तर लिपस्टिकचे हे शेड्स तुमच्या ड्रेसच्या कलरशी मिक्स आणि मॅच करू नका. जाणून घ्या.
जर तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी बोल्ड अँड ब्राइट रंगाचे कपडे निवडत असाल तर त्यासोबत बोल्ड कलर लिपस्टिक शेड्स निवडू नका. बोल्ड आणि ब्राइट रंगांना मिक्स अँड मॅच केल्याने तुमचे रुप लक्ष वेधून घेणार नाही. त्यामुळे बोल्ड कलरचे आउटफिट निवडताना लिपस्टिक हलकी ठेवा. किंवा तुम्ही तुमची लिपस्टिक ब्राइट आणि बोल्ड असेल तर कपडे पेस्टल शेडमध्ये निवडा.
जर तुम्ही गुलाबी रंगाचे कपडे घालत असाल तर लिपस्टिकच्या ब्राउन शेड्स कधीही मॅच करू नका. यामुळे तुमचा सुंदर गुलाबी रंग निस्तेज होईल. ब्राउन शेड डार्क पिंक किंवा ब्राइट पिंक सारख्या गरम रंगांसह फिट होत नाही. ब्राउन शेड टाळावे.
जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लाल शेडचा ड्रेस घालणार असाल तर त्यासोबत चुकूनही लाल रंगाची लिपस्टिक मॅच करू नका. हे पूर्णतः आउटडेटेड आहे. रेड ड्रेससोबत न्यूड पिंक, न्यूड ब्राऊन असे रंग क्लासी लुक देतील. आणि तुमचा लाल ड्रेस सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनेल. हे लिपस्टिक शेड तुमचा लूक आणखी खुलवतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)