Valentine's Day Gift Ideas for Boyfriend: लव्ह बर्ड्सचा आवडता महिना म्हणजे फेब्रुवारी सुरू झाला असून, दोन दिवसात व्हॅलेंटाईन वीक सुरु होत आहे. आठवडाभर विविध दिवस साजरे केल्यानंतर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या खास दिवशी पार्टनर एकमेकांना गिफ्ट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. तुम्हालाही या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचे असेल पण काय द्यायचे याबाबत कंफ्यूज असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत. या गोष्टी गिफ्ट करून तुम्ही बॉयफ्रेंडला सरप्राइज देऊ शकता.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही खास द्यायचे असेल तर त्याला व्रिस्ट वॉट गिफ्ट करा. डिजिटलच्या युगात आपल्या बॉयफ्रेंडला डिजिटल वॉच गिफ्ट देणे ही चांगली कल्पना आहे. स्मार्ट वॉचमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन चांगली घड्याळ खरेदी करू शकता. यामध्ये अनेक प्रकार आहेत.
जर तुमच्या बॉयफ्रेंडला गाणी ऐकायची आवड असेल तर तुम्ही त्याला चांगला स्पीकर देऊ शकता. ब्लूटूथ स्पीकर्सचे अनेक प्रकार आहेत. जर तुमच्या जोडीदाराला गायला सुद्धा आवडत असेल तर त्याला एक स्पीकर द्या जो माईकसह येतो. याने त्याचा छंद जोपासला जाईल.
मुलांना स्टायलिश दाढी ठेवायला आवडते. तुमच्या जोडीदाराला सलूनमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही ट्रिमर किंवा स्किन केअर आयटम्स सारख्या ग्रूमिंग आयटम्स गिफ्ट करू शकता. तुमच्या पार्टनरला हे गिफ्ट आवडेल आणि ते त्याला खूप उपयोगी सुद्धा पडेल. तुमच्या त्याच्या स्किन टाइपनुसार ग्रुमिंग किट कस्टमाइज करू शकता.
तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला ट्रॅक सूट भेट देऊ शकता. त्याच्यासाठी ही एक अतिशय उपयुक्त भेट आहे. ट्रॅक सूटमध्ये अनेक प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार आणि सोईनुसार निवडू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या