Valentines Day 2025 : सुरू होतोय प्रेमी युगुलांचा ‘व्हॅलेंटाईन वीक’; आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentines Day 2025 : सुरू होतोय प्रेमी युगुलांचा ‘व्हॅलेंटाईन वीक’; आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस!

Valentines Day 2025 : सुरू होतोय प्रेमी युगुलांचा ‘व्हॅलेंटाईन वीक’; आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस!

Published Feb 06, 2025 10:23 AM IST

Valentines Week Full List : उद्यापासून प्रेमी युगुलांसाठी अतिशय खास असलेला ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू होत आहे. जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणता दिवस कधी साजरा केला जातो.

सुरू होतोय प्रेमी युगुलांचा ‘व्हॅलेंटाईन वीक’; आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस!
सुरू होतोय प्रेमी युगुलांचा ‘व्हॅलेंटाईन वीक’; आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस!

Valentines Week Full List 2025 : वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी हा प्रेमीयुगुलांसाठी खूप खास असतो. या महिन्यात प्रेमी युगुल एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात. ज्यासाठी त्यांना आठवडाभराची परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते. प्रेमाच्या या परीक्षेत जे जोडपे उत्तीर्ण होतात, त्यांना त्यांचे प्रेम भेट म्हणून मिळते. या परीक्षेच्या तयारी दरम्यान काही लोक उत्साही असतात, तर काही लोक थोडे नर्व्हस दिसतात. कारण, या परीक्षेत कोणीही कॉपी करू शकत नाही. आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण डेटशीट घेऊन आलो आहोत. जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणता दिवस कधी साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक लिस्ट

रोज डे, ७ फेब्रुवारी

‘व्हॅलेंटाईन वीक’ची सुरुवात ‘रोज डे’ने होते, जो प्रेमी युगुल दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा करतात. या दिवशी जोडपी एकमेकांना गुलाब किंवा फुले भेट देतात. असे मानले जाते की, गुलाबाचा ताजेपणा आणि सुगंध प्रेमीयुगुलांच्या नात्यात गोडवा आणण्याचे काम करतो.

प्रपोज डे, ८ फेब्रुवारी

जर तुम्ही अद्याप तुमच्या क्रशला प्रपोज करू शकला नसाल, तर हा दिवस खास तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे. या दिवशी एखादी सुंदर भेट वस्तू देऊन, तुम्ही त्यांना तुमच्या हृदयाची स्थिती सांगू शकता.

चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी

‘चॉकलेट डे’ आपल्या नात्यात प्रेमाचा गोडवा भरण्याचे काम करतो. या दिवशी जोडपी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन आपल्या प्रेमसंबंधात गोडवा आणतात.

व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या पार्टनरसोबत या मंदिरांना भेट द्या, प्रेम वाढेल, आयुष्यभर एकत्र राहाल

टेडी डे, १० फेब्रुवारी

१० फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस ‘टेडी डे’ म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी मुलगा आपल्या पार्टनरला एक क्यूट टेडी गिफ्ट करतो.

प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रेमाच्या बंधनात एकमेकांना बांधून ठेवण्याचे वचन घेऊन येतो. या दिवशी प्रेयसी एकमेकांना वचन देतात की ते आयुष्यभर प्रेमात दिलेली वचने पूर्ण करतील.

हग डे, १२ फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस ‘हग डे’ म्हणून साजरा केला जातो. अनेक संशोधनांनुसार, मिठी मारल्याने बहुतांश समस्या अल्पावधीतच संपतात. अशावेळी जर तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद होत असतील, तर त्यांना गोड मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करा.

किस डे, १३ फेब्रुवारी

'किस डे' हा प्रेमाला गंतव्यस्थानापर्यंत नेण्याची पहिली पायरी मानली जातो.

व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना क्वालिटी टाईम देऊन आपलं नातं मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner