Valentine's Day 2025 : गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine's Day 2025 : गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या

Valentine's Day 2025 : गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या

Feb 04, 2025 02:37 PM IST

Meaning Of Each Number Of Roses: या व्हॅलेंटाईन डेला जर तुम्ही तुमच्या मनातील भावना शेअर करण्यासाठी प्रिय व्यक्तीला गुलाब देणार असला, तर त्याचा रंगच नव्हे तर संख्याही नक्कीच लक्षात घ्या.

गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या
गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या (shutterstock)

Number of Roses Meaning: प्रत्येकजण दरवर्षी येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची आतुरतेने वाट पाहत असतो. हा असा दिवस आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आपल्या जोडीदाराशी बोलण्यात त्याच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी काही क्षण राखून ठेवते. या खास दिवशी प्रेमीयुगुल आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांचा वापर करतात. असे मानले जाते की, प्रत्येक रंगाच्या गुलाबाला एक विशेष अर्थ असतो. पण, तुम्हाला माहीत आहे का, इजहार-ए-मोहब्बतसाठी गुलाबाचा रंगच नव्हे, तर त्याच्या संख्येचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यात गडबड झाली तर, आपल्या जोडीदाराला आपल्या भावनांबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो. चला जाणून घेऊया प्रेमाच्या या सणाला कुणाला किती गुलाब द्यायचे आणि त्याचा अर्थ काय... 

गुलाबाच्या संख्यांचा अर्थ काय?

१ गुलाब 

व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला एक गुलाब देणं म्हणजे तुम्ही त्यांना सांगू इच्छिता की, तुम्ही पहिल्या नजरेतच त्यांच्या प्रेमात पडला आहात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये यायचं आहे.

२ गुलाब

दोघेही जोडीदार एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा जोडीदाराला दोन गुलाब दिले जातात.

३ गुलाब

तीन गुलाब अनेकदा आपल्या प्रेमाचा वर्धापनदिन साजरा करण्याचे प्रतीक असतात.

४ गुलाब

चार गुलाब देणे म्हणजे तुमच्या दोघांमधलं प्रेमाचं नातं इतकं घट्ट आहे की, त्यात दुसऱ्या कुणाला ही यात यायला वाव नाही.

व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या पार्टनरसोबत या मंदिरांना भेट द्या, प्रेम वाढेल, आयुष्यभर एकत्र राहाल

५ गुलाब

पाच गुलाब आपल्या जोडीदाराप्रती आपले प्रेम आणि काळजी दर्शवितात.

६ गुलाब

सहा गुलाबांचा पुष्पगुच्छ शाळा, कॉलेज किंवा ऑफिस क्रशला देऊ शकता. 

९ गुलाब

जोडीदाराचा सहवास आणि प्रेम आयुष्यभर हवं असेल, तर त्याला ९ गुलाब भेट द्यावेत.

१२ गुलाब

तुमच्या जोडीदारासोबत भावना शेअर करताना तुम्हाला त्यांना सांगायचे असेल की, तुम्ही नेहमी फक्त माझे असाल, तर त्यांना १२ गुलाबांचा पुष्पगुच्छ द्या.

२४ गुलाब

एखाद्याला २४ गुलाब देणे म्हणजे आपण त्यांना सांगू इच्छिता की, तुम्ही फक्त त्यांच्यासाठीच या पृथ्वी तलावर आहात आणि कायम त्यांच्याबरोबर राहू इच्छित आहात.

आता तुम्हाला गुलाबांच्या संख्येचा अर्थ तर कळला आहे. तर,  या व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रिय व्यक्तीला खास अंदाजात आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी तयार व्हा!

Whats_app_banner