Valentine Gift Ideas: व्हॅलेंटाईन डेला कपल्स एकमेकांना देऊ शकतात हे गिफ्ट, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल काम-valentine day gift ideas in budget for girlfriend and boyfriend under rs 500 ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine Gift Ideas: व्हॅलेंटाईन डेला कपल्स एकमेकांना देऊ शकतात हे गिफ्ट, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल काम

Valentine Gift Ideas: व्हॅलेंटाईन डेला कपल्स एकमेकांना देऊ शकतात हे गिफ्ट, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल काम

Feb 10, 2024 11:28 PM IST

Gift Ideas Under Rs.500: व्हॅलेंटाईन डेला पार्टनर एकमेकांना गिफ्ट देतात. जर तुम्हाला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला बजेटमध्ये गिफ्ट द्यायचे असेल तर ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीतील हे गिफ्ट पर्याय पाहा.

बजेट फ्रेंडली व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आयडिया
बजेट फ्रेंडली व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आयडिया (unsplash)

Valentine Day Gifts in Budget: व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईन डेला कपल्स एकमेकांना अनेक गिफ्ट देतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेमाला स्पेशल फिल करून देण्यासाठी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड एकमेकांना विशेष गिफ्ट देतात. पण नेमकं काय गिफ्ट द्यायचे याबाबत अनेकदा कंफ्यूजन होते. येथे आम्ही तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या काही गिफ्ट सांगत आहोत. हे गिफ्ट बजेट फ्रेंडली असून, तुमच्या पार्टनरला नक्की आवडेल.

फोटो मग

कपल्स एकमेकांना फोटो मग देऊ शकतात. ते ५०० रुपयांपेक्षा कमी खर्चात तयार होतात. यासाठी तुमचा आवडता फोटो निवडा आणि मग त्यावर प्रिंट करून घ्या. हे असे गिफ्ट आहे जे तुमचा पार्टनर अतिशय काळजीपूर्वक जपेल.

बॅग

तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसाठी लॅपटॉप बॅग खरेदी करू शकता. त्याची किंमत ५०० रुपयांपर्यंत येते. त्यात अनेक प्रकार आहेत. तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला हँड बॅग देऊ शकतो.

शो पीस

तुमच्या पार्टनरजवळ मनातील भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही शो पीस खरेदी करू शकता. तुम्ही असे गिफ्ट घेऊ शकता ज्यात तुम्ही तुमच्या पार्टनरचे नाव लिहू शकता.

ज्वेलरी

फक्त मुलीच नाही तर मुलांसाठी सुद्धा अनेक प्रकारचे ज्वेलरी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला आवडतील असे काही ज्वेलरी गिफ्ट करू शकता. तुमच्या पार्टनरला कस्टमाईज ज्वेलरी सुद्धा आवडेल.

 

फोटो अल्बम

तुमचे काही आवडते फोटो निवडा आणि त्यांचा फोटो अल्बम बनवा. ही एक संस्मरणीय भेट आहे. तुम्ही फोटोसोबत काही मेसेजही लिहू शकता. ही एक उत्तम गिफ्ट आहे जी तुम्ही कमी बजेटमध्ये बनवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग