Happy Valentine Day : तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला 'प्रेमाचा महिना' म्हणतात. ७ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा केला जातो. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. व्हॅलेंटाईन वीक मधला महत्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे जो १४ फेब्रुवारी रोजी साजरा होतो.
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली असे सांगितले जाते. तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्तीला या दिवशी खूश करण्यासाठी काय करावं असा विचार करत असाल तर हे हटके मेसेज तुम्हाला उपयोगी येतील. व्हॅलेंटाइन डे च्या या शुभेच्छा पाठवून तुमची प्रेमाची जादू दाखवा.
आपल्या प्रेमाची ही जादू
सोबत आयुष्यभर नांदू
एकमेकांना देऊ साथ
खडतर वाटेवरही सोडू नाही हात
माझा-तुझा हा सहवास
शेवटपर्यंतचा खास प्रवास
व्हॅलेंटाईन डे च्या प्रेममय शुभेच्छा
…
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे,
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे,
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
…
आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस.
व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा
…
तुझं माझं नातं असं असावं
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं,
कितीही एकमेकांपासून दूर असलो
तरी मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं,
Happy Valentine's Day
…
वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !
व्हॅलेंटाइन डे च्या खूप खूप शुभेच्छा
…
वाट पाहणे तुझी,
हाच राहिला एक ध्यास.
दुसरा विचार नाही मी करत,
तूच जीवन तूच आहेस श्वास.
व्हॅलेंटाइन डे च्या प्रेममय शुभेच्छा
…
काही क्षणांसाठी निघून गेलो,
पण आपण प्रत्येक क्षणी जवळ असतो,
क्षणभरही मी तुला कसे विसरू शकतो,
जेव्हा प्रेम आयुष्यभरासाठी असते.
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
…
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.
हॅपी व्हॅलेंटाईन डे
संबंधित बातम्या