Propose Day पूर्वी समजून घ्या पार्टनरप्रती असलेल्या फीलिंग, या भावना टिकवणार नाही नाते
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Propose Day पूर्वी समजून घ्या पार्टनरप्रती असलेल्या फीलिंग, या भावना टिकवणार नाही नाते

Propose Day पूर्वी समजून घ्या पार्टनरप्रती असलेल्या फीलिंग, या भावना टिकवणार नाही नाते

Feb 07, 2024 11:06 PM IST

Valentine Day 2024: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज दिवस म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला आपल्या पार्टनर बद्दल या काही भावना असतील तर नाते जास्त काळ टिकणार नाही हे समजून घ्या.

प्रपोज डे - रिलेशनशिप टिप्स
प्रपोज डे - रिलेशनशिप टिप्स (unsplash)

Couple Relationship Tips: व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला असून, दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येक लव्ह बर्ड्स आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्याचा आणि प्रभावित करण्याचा मार्ग शोधत असतो. पण जन्मोन जन्मी एकत्र राहण्याचे वचन देण्याआधी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये सर्व काही सामान्य असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकालीन नाते टिकवायचे असेल आणि लग्न करायचे असेल तर आधी पार्टनरसोबत असताना तुम्हाला काय वाटते हे जाणून घेणे महत्त्वाचेआहे. जर तुम्हाला अशी भावना असेल तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात कमिटेड नाही आणि हे नाते जास्त काळ टिकणार नाही.

हे जेश्चर दाखवतात की तुम्ही नात्यासाठी कमिटेड नाही

- तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेलात. पण ते गांभीर्याने घेत नाही. तर याचा अर्थ तुमच्यासाठी हे नाते महत्त्वाचे नाही. व्हॅलेंटाईन डेला प्रपोज केले तरी ते फार काळ टिकणार नाही.

- आपल्या पार्टनरसोबत फिरणे, शॉपिंग करायला आवडते. पण एकत्र भविष्याचा विचार करत नाही. तर तुम्ही रिलेशनशिपबाबत गंभीर नसल्याचं हे लक्षण आहे.

- जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल खूप विचार करत असाल आणि तुमच्या मनात संभ्रम असेल, तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसाठी योग्य नसल्याचं हे लक्षण आहे.

- तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्लॅनिंगमध्ये तुमच्या पार्टनरचे सहकार्य घेत नाही आणि त्याची माहिती देणे आवश्यकही मानत नाही. या गोष्टी दर्शवतात की तुम्ही तुमच्या पार्टनरला गांभीर्याने घेत नाही आणि नाते टिकवण्याचा विचार करत नाही.

- कोणत्याही भावनिक किंवा गंभीर गोष्टी जोडीदारासोबत शेअर करायला आवडत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी इमोशनली अटॅच नसाल.

 

- जेव्हा तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि समर्पण व्यक्त करतो, तेव्हा तुम्हाला एक बंधन वाटते. तर हे सूचित करते की तुम्ही या नात्यात फिट आणि कमिटेड नाही. अशा परिस्थितीत अशा नात्यातून वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner