Valentine Day Celebration Ideas: फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. रोझ डेपासून सुरु होणाऱ्या या प्रेमाच्या आठवड्यात लोक वेगवेगळे दिवस साजरे करतात. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. लव्हर्स खूप आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे रोजी पार्टनर एकमेकांवर खूप प्रेम करतात. या खास प्रसंगी जर नवरा-बायकोला फॅन्सी डेटवर कुठे बाहेर जायचे नसेल तर ते या पद्धतीने घरी राहून व्हॅलेंटाईन डे खास बनवू शकतात. पाहा या रोमँटिक युनिक आयडिया.
तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यापेक्षा काही छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेशल फील करू शकता. अशा परिस्थितीत तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी गाणे म्हणून शकता रोमँटिक गाणे तुमच्या जोडीदाराला खूप आनंद देऊ शकते. किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरचे आवडते गाणे सुद्धा म्हणून शकता.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पार्टनरला चांगले फील द्यायचे असेल तर तुम्ही त्यांना मसाज देऊ शकता. चांगला मसाज देण्यासाठी तुम्ही इंटरनेटवरून काही व्हिडिओ पाहू शकता. हा मसाज देण्यासाठी तुम्ही तुमची रुम सुद्धा सजवू शकता. रूमचे सुगंधी मेणबत्ती लावा आणि लाइट म्युझिकने सुंदर वातावरण तयार करा.
तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी एकत्र चित्रपट पहा. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी तुम्ही एकमेकांचा आवडता चित्रपट एकत्र पाहू शकता. चित्रपट पाहण्यासाठी एकत्र बसा आणि नंतर तुमचे काही आवडते पदार्थ घ्या आणि चित्रपटाचा आनंद घ्या. तुम्ही घरी मिटी थिएटर लूक क्रिएट करू शकता.
एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा स्वयंपाक हा एक उत्तम मार्ग आहे. व्हॅलेंटाईन डेला आपल्या जोडीदाराच्या आवडत्या डिश बनवा. तुम्ही दोघे एकत्र स्वयंपाक करून क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)