Yoga Poses for Asthma Patient: पावसाळ्यात दमा असलेल्या लोकांना बराच त्रास होतो. ढगाळ वातावरण, सततचा पाऊस यामुळे त्यांना श्वसनाच्या समस्या उद्भवतात. वास्तविक दमा हा एक गंभीर आजार आहे, जो फुफ्फुसावर हल्ला करून श्वसनावर परिणाम करतो. योग्य आहार, औषधांसोबतच दम्याच्या रुग्णांसाठी योगासन अत्यंत फायदेशीर मानले जाते. रोज काही योगासने करून या समस्येपासू आराम मिळवता येतो. ही योगासनं नियमित केल्याने काही काळातच तुम्हाला परिणाम दिसून येईल. दम्याच्या रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी रोज कोणते योगासन करावे हे जाणून घ्या.
सायनस आणि दम्याचा त्रास असलेल्या असलेल्या रुग्णांसाठी अधोमुख श्वानासन हे एक चांगले योगासन आहे. हे आसन केल्याने मन शांत राहण्यासोबतच तणावही दूर राहतो. हे योग अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा नियमित सराव केल्याने बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो.
दम्याच्या रुग्णांना दररोज धनुरासनाचा सराव केला तर हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आसन करताना व्यक्तीचे शरीर धनुष्यासारखे वाकलेले असते. हे आसन करताना तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. हे तुमची फुफ्फुस मजबूत ठेवण्यास मदत करते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि विरुद्ध दिशेने पाय वाकवून हातांनी धरा. यानंतर छातीचा वरचा भाग वर करून काही काळ या स्थितीत राहा आणि नंतर पूर्वीच्या स्थितीत या. हे करत असताना सतत श्वास आत घ्या आणि सोडत रहा.
भस्त्रिका हा प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा संचार चांगला होतो. ज्यामुळे दम लागणे किंवा मधूनमधून श्वास घेण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम मांडी मारून सरळ बसा. यानंतर शरीराचा कोणताही भाग न हलवता, नाकातून आवाज काढताना श्वास घ्या आणि नंतर आवाज करतच श्वास सोडा. हे आसन रोज सकाळी १ ते ३ मिनिटे केल्याने फायदा होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)