Stress Management Tips for Students: बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत विशेषत: जे मुले पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत ते खूप तणावाखाली येतात. या काळात पालकांनी त्यांच्या आहाराची आणि रुटीनची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ तर मिळेलच शिवाय योग्य विश्रांतीही मिळेल आणि जास्त ताणही घेणार नाही. यामुळे त्यांनी काय वाचले ते लक्षात राहील आणि ते परीक्षेत नीट पेपर लिहू शकतील. परीक्षांमुळे तुमचा मुलगा रात्रंदिवस तणावात अभ्यास करत असेल तर त्याला तणावापासून दूर ठेवा. स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त आहेत.
तसं तर अनेक मुले स्वतःच वेळापत्रक बनवतात. पण मुलांचे अभ्यासाचे वेळापत्रक पालकांनी तपासावे. असे वेळापत्रक बनवा जे वास्तववादी आणि फॉलो करण्यास सोपे असावे. यामध्ये अभ्यासासोबतच खाणे, झोपणे आणि आराम करण्याची वेळ निश्चित असावी. जेणेकरून मुलावरील ओझे वाढू नये आणि मुलाला आवश्यक विश्रांती मिळेल.
तुम्ही मुलाला काही ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवले पाहिजे. जेणेकरून तो स्वतःला रिलॅक्स करू शकेल. ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि स्ट्रेचिंग यामुळे तणाव कमी होईल. शरीराला आराम दिल्याने मनाला आराम मिळतो. यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते.
मुलाचे अभ्यासात मन लागावे यासाठी घरातील वातावरण शांत ठेवा. आवाज आणि गोंगाट त्याला डिस्टर्ब करतील. तसेच अभ्यासाचे सर्व साहित्य व नोट्स अभ्यासाच्या टेबलवर ठेवा. जेणेकरून ही छोटी कामे करण्यात मुलांचा वेळ वाया जाणार नाही.
मुले परीक्षेची तयारी करत असेल तर तुम्ही त्याला मानसिक आधार सुद्धा दिला पाहिजे. जेणेकरून परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती त्याच्या मनात निर्माण होणार नाही. मुले अनेकदा भीतीपोटी चुका करतात. मुलाला सपोर्ट करा की फक्त परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांची योग्यता कमी होणार नाही. अभ्यास जास्त महत्त्वाचे आहे. जेणेकरून मुलांना निकालाची फारशी चिंता न करता परीक्षेची तयारी करता येईल.
मुलाला समजावून सांगा की अभ्यासाबरोबरच स्वत:ची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्य टिकून राहते. नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या. जेणेकरून शेवटच्या क्षणी आजारी पडण्याचा धोका कमी होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)