मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi 2024: आवडत्या कपड्यांवरचे होळीचे रंग जात नाहीयेत? या टिप्सने होतील साफ!

Holi 2024: आवडत्या कपड्यांवरचे होळीचे रंग जात नाहीयेत? या टिप्सने होतील साफ!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 25, 2024 11:48 PM IST

Get rid of Holi colors: होळी खेळताना जर तुमच्या ड्रेसवर रंगाचे पक्के डाग पडले असतील तर तुम्ही काही सोप्या पद्धतींनी हे रंग दूर करू शकता.

use this tips and tricks to remove colour stain from cloths
use this tips and tricks to remove colour stain from cloths (freepik)

Home Remedies: लोक होळीच्या सणाची अनेक दिवस आधीच आतुरतेने वाट पाहत असतात. आज हा दिवस साजरा झाला. सोमवार, २५ मार्चला रोजी देशभरात रंगांचा हा सण साजरा झाला. लोकांनी रंगाच्या या सणाचा भरपूर आस्वाद घेतला. ज्या लोकांना होळी खेळायची नव्हती त्यांच्यावरही लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगांचा वर्षाव करण्यात आला. तर अनेकदा आपले आवडत्या कपड्यांवर पक्के रंग पडतात. त्यामुळे कपड्यांवर डाग पडतात. अशावेळी काय करायचे समजत नाही. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोप्या टिप्स आणल्या आहेत. जे वापरून तुम्ही कपड्यांमधून होळीचे रंग सहज काढू शकाल.

टूथपेस्टचा करा वापर

तुम्ही टूथपेस्टने होळीच्या रंगाचे डाग कपड्यांवरून काढू शकता. जिथे रंगाचे डाग असतील तिथे टूथपेस्ट लावा. १५ मिनिटे असेच ठेवा. काही वेळाने कापड घासून स्वच्छ करा. असे दोन-तीन वेळा केल्यास तुमच्या कपड्यांमधले हे हटके रंग निघून जातील.

How To Remove Color: चेहऱ्यावर लागलेला पक्का रंग कसा काढायचा? जाणून घ्या टिप्स!

लिंबू ठरेल उपयुक्त

रंग काढायला लिंबू खूप फायदेशीर आहे. सर्व प्रथम कापड स्वच्छ पाण्यात धुवा. त्यानंतर अर्ध्या बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात सर्फ टाका आणि कपडे भिजवा. कपडे धुतल्यावर, जिथे गुलाल किंवा रंगाचा डाग असेल तिथे लिंबाचा रस लावून चोळा.

Holi 2024: भांगेच्या हँगओव्हरपासून सुटका हवी आहे? घरी बनवा हे डिटॉक्स पेय!

अ‍ॅपल साइड व्हिनेगर

अ‍ॅपल साइड व्हिनेगर कपड्यांवरील रंगाचे डाग अगदी सहजपणे काढू शकतो. यासाठी प्रथम कपडे पाण्याने धुवा, त्यानंतर बादलीत अर्धे पाणी भरून त्यात २-३ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घाला आणि आता या पाण्यात कपडे बुडवून पुन्हा धुवा. असे केल्याने हट्टी रंगाचे डाग दूर होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग