मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Use This Hairpack For Oily Hair

Oily Hair Care: तेलकट केसांसाठी वापरा हे हेअर पॅक, एकाच वेळी निघून जाईल तेल!

Hair Care
Hair Care (Freepik )
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
May 15, 2023 09:01 AM IST

Hair Packs: तेलकट केसांची नक्की कशी काळजी घ्यावी किंवा नक्की कोणत्या प्रकारचा हेअरपॅक वापरावा हे जाणून घ्या.

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात जशी आपण शरीराची काळजी घेतो तशीच केसांची काळजी घ्यावी लागते. नाही तर अनेक समस्या होऊ शकतात. या ऋतूमध्ये घामामुळे केसांची अवस्था बिकट होते. उन्हाळ्याच्या उन्हामुळे केस खराब होऊ लागतात आणि घामामुळे केस लवकर तेलकट दिसू लागतात. कडक सूर्यप्रकाश आणि घामामुळे केसांमध्ये जास्तीचे तेल तयार होऊ लागते, ज्यामुळे कोंड्याची समस्या देखील होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही हेअर पॅकची रेसिपी सांगणार आहोत, जे तेल लावल्याने तुमचे तेलकट केस निघून जातील.

ट्रेंडिंग न्यूज

मुलतानी मातीचा हेअर पॅक

तेलकट केसांसाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. हा पॅक बनवण्यासाठी ३ चमचे मुलतानी मातीमध्ये २ चमचे दही आणि १ चमचा मेथी पावडर मिसळा. ते सर्व चांगले मिसळा आणि आठवड्यातून १ ते २ वेळा २० मिनिटे केसांवर लावा.

कोरफड जेलचा हेअर पॅक

तेलकट केसांपासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही मेथी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून ताजे कोरफड जेल लावू शकता. कोंड्याची समस्याही या पॅकने निघून जाईल.

मेथी पावडरचा हेअर पॅक

हा हेअर पॅक बनवण्यासाठी ४ चमचे मेथी पावडरमध्ये दही घाला. हे मिश्रण चांगले फेटा आणि पॅक टाळूवर लावा. साधारण २० ते ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा.

केळीचा पॅक

पिकलेल्या केळ्याचा पॅक तेलकट केसांसाठी फायदेशीर ठरतो. यासाठी केळी मॅश करून त्यात दही घाला. ही पेस्ट टाळूवर लावा आणि १ तासानंतर धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel