Kitchen Tips: चहा गाळून उरलेली चहापूड फेकून देता? थांबा, त्वचेपासून-केसापर्यंत आहेत फायदेच फायदे-use of leftover tea powder left over from tea straining for hair and skin ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: चहा गाळून उरलेली चहापूड फेकून देता? थांबा, त्वचेपासून-केसापर्यंत आहेत फायदेच फायदे

Kitchen Tips: चहा गाळून उरलेली चहापूड फेकून देता? थांबा, त्वचेपासून-केसापर्यंत आहेत फायदेच फायदे

Aug 10, 2024 09:31 AM IST

Use Of Leftover Tea Leaves: प्रत्येक घरात सकाळ, संध्याकाळ चहा नक्कीच तयार होतो. चहा बनवल्यावर भरपूर चहापूड उरते. त्याला अनेकदा निरुपयोगी, कचरा समजून डस्टबिनमध्ये फेकून दिले जाते.

चहा गाळून उरलेल्या चहापूडचे फायदे
चहा गाळून उरलेल्या चहापूडचे फायदे (Shutterstock)

Use Of Leftover Tea Leaves: आपल्या देशात एक असे पेय आहे, ज्याचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग आहे. हे पेय म्हणजे चहा होय. येथे लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. जवळपास प्रत्येक घरात सकाळ, संध्याकाळ चहा नक्कीच तयार होतो. चहा बनवल्यावर भरपूर चहापूड उरते. त्याला अनेकदा निरुपयोगी, कचरा समजून डस्टबिनमध्ये फेकून दिले जाते. पण निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या या उकळलेल्या चहापूडने अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात , हे तुम्हाला माहीत आहे का? घराची साफसफाई करण्यापासून ते आपले सौंदर्य वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये या चहापूडचा फायदा होतो. तुम्हीही चहापूड फेकत असाल, तर आता अजिबात असे करू नका.

चहा गाळून राहिलेल्या चहापूडचे फायदे-

घरच्या सफाईसाठी उपयोग-

उकळलेल्या चहापूडच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करू शकता. या चहापूड ने तुमचे घर साफ करणे अगदी सोपे होईल. या चहापूडच्या मदतीने घरातील आरसे अगदी नव्यासारखे चमकू लागतील. यासाठी उरलेली चहापूड पुन्हा पाण्यात उकळा. हे पाणी स्प्रे बाटलीत भरून भरून ठेवा. आणि दररोज त्याच्या मदतीने आरसे स्वच्छ करा. अशाने तुमचे आरसे कधीच अस्वच्छ आणि जुने दिसणार नाहीत. यासोबतच तुमचे गॅस बर्नर कितीही काळे झाले असले तरी, तुम्ही ते काही मिनिटांत चहापूडच्या मदतीने साफ करू शकता. चहापूडच्या पाण्यात थोडे डिशवॉश मिसळा आणि ब्रशच्या मदतीने स्क्रब करून गॅस बर्नर स्वच्छ करा.

काही मिनिटांत पायांची दुर्गंधी करा दूर-

दिवसभर शूज घातल्यामुळे अनेकदा पायांना दुर्गंधी येऊ लागते. तुम्ही कितीही पाय स्वच्छ केले आणि पाय धुतले तरी ती दुर्गंधी दूर होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही उकळलेल्या चहापूडची मदत घेऊ शकता. यासाठी चहा करून उरलेली चहापूड पाण्यात नीट उकळून घ्या. उकळी आली की गॅस बंद करा आणि पाणी कोमट होईपर्यंत थांबा. आता या पाण्यात तुमचे पाय सुमारे १० ते १५ मिनिटे भिजवा. असे रोज दोन ते तीन दिवस केल्याने तुमच्या पायांचा वास कायमचा निघून जाईल.

चमकदार केस-

चहा करून उरलेली चहापूड तुमच्या केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. ही चहापूड तुमच्या केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. यासोबतच केसही खूप निरोगी राहतात. यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ पाण्यात उरलेली चहापूड उकळावी लागेल. उकळल्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. शॅम्पूने केस धुतल्यानंतर या पाण्यात पुनः केस धुवा. काही दिवसातच, तुमच्या केसांची स्थिती सुधारेल आणि त्यांना नैसर्गिक चमक देखील मिळेल. शिवाय केसांना पोषण मिळून केस वाढण्यासही मदत होईल.

झाडे आणि वनस्पतींसाठी नैसर्गिक खताचे काम-

घरात झाडे-वनस्पती असतील तर त्यांची वाढ चहापूडच्या साहाय्याने दुप्पट करता येते. यासाठी फक्त उरलेली चहापूड तुमच्या झाडांना खत म्हणून घाला. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन ते निरोगीही राहतील. फक्त लक्षात ठेवा की साखरेसह चहाची पाने वापरू नका. जर तुमच्याकडे चहाची पाने साखरेसह असतील तर तुम्ही ती पाण्यात नीट धुवून वापरू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

विभाग