आपण विविधतेने नटलेल्या भारत देशात राहातो. इथे प्रत्येक पावलावर पूर्णपणे वेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्माला मानणारे, वेगवेगळे कपडे घालणारे, वेगवेगळे खाद्या पदार्थ खाणारे लोक असतात. प्रत्येकाला आपले आयुष्य स्वतंत्र्यपणे जगण्याचा आणि श्रद्धेचे पालन करण्याचा अधिकार आहे. आज आम्ही तुम्हाला देशात असणाऱ्या वेगवेगळ्या मंदिरांविषयी सांगणार आहोत. भारतातील एका मंदिरांमध्ये बुलेट गाडीची पूजा होते तर दुसऱ्या मंदिरात श्वानाची पूजा केली जाते हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत झाला असाल. चला जाणून घेऊया देशातील अशाच काही मंदिराविषयी...
करणी मातेचे मंदिर हे फार वेगळे मंदिर आहे. राजस्थानमधील बिकानेर येथे हे मंदिर आहे. या मंदिराला उंदरांचे मंदिर असेही म्हणतात. प्रत्यक्षात या मंदिरात सुमारे पंचवीस हजार उंदीर आहेत. या मंदिरात उंदरांची पूजा करण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. त्यांना देवी-देवतांप्रमाणे प्रसादही अर्पण केला जातो. ज्या भक्ताचा प्रसाद उंदीर खातो तो खूप भाग्यवान मानला जातो. विशेष म्हणजे या मंदिरात मेलेल्या उंदीराची चांदीची मूर्ती बनवली जाते.
वाचा: रोजच्या आहारात चिया सीड्सचा करा समावेश, राहा आजारांपासून लांब
मध्य प्रदेशमध्ये असलेल्या काल भैरवचे मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. या मंदिराला व्हिस्की देवी मंदिर असे ही म्हटले जाते. येथे येणारे लोक देवाला दारू अर्पण करतात. मंदिराबाहेर प्रसादाची फुले आणि मद्यविक्री ची दुकाने रांगेत पाहायला मिळतील. येथे सरकारने अनेक दारुची दुकानेही उघडली आहेत जिथे देशी-विदेशी दारू उपलब्ध आहे.
वाचा: गरोदरपणात सीट बेल्ट लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या कोणत्या चुका भारी ठरू शकतात
राजस्थानमधील जोधपूर येथे बुलेट बाबाचे अनोखे मंदिर आहे. या मंदिरात बुलेटची पूजा केली जाते. अनेक वर्षांपूर्वी तेथे राहणारे ओम बन्ना आपली बुलेट घेऊन कुठेतरी जात असताना वाटेतच त्यांचा अपघात झाला. या अपघातात ओम बन्ना यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांची बुलेट उचलून पोलीस ठाण्यात आणली. पण ती बुलेट रात्री स्वत:हून अपघातस्थळी पोहोचली. पोलीस वारंवार ही बुलेट आणत असत आणि ती वारंवार त्याच ठिकाणी पोहोचत असे. हा चमत्कार पाहिल्यानंतर तेथील लोकांनी त्या ठिकाणी एक मंदिर बांधले ज्याला बुलेट बाबाचे मंदिर म्हणतात.
वाचा: रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्याची चमक वाढवतात ही योगासने, जाणून घ्या कशी करायची?
पंजाबमधील जालंधर मध्ये एक अनोखी गुरुद्वारा आहे. तिला एरोप्लेन गुरुद्वारा असेही म्हणतात. असे मानले जाते की अनेक वर्षांपूर्वी काही मुले परदेशात जाण्यासाठी व्हिसाची वाट पाहत असताना ते या गुरुद्वारामध्ये प्लास्टिकच्या विमानात बसत असत. काही दिवसांनी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला परदेशात जाण्याची इच्छा असते तो या गुरुद्वारामध्ये जाऊन इच्छा व्यक्त करतो. तसेच तेथे विमान अर्पण करतो. येथे प्रसादात बरीच विमाने गोळा केली जातात, जी अनाथ मुलांना वितरित केली जातात.
कर्नाटकात एक अनोखे मंदिर आहे जेथे श्वानाची पूजा केली जाते. चन्नापट्टण श्वान मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. हे मंदिर इथल्या एका मोठ्या व्यापाऱ्याने बांधलं होतं. असे म्हटले जाते की त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात देवी आली आणि तिने मंदिर बांधण्यास सांगितले तसेच मंदिरात श्वानाची पूजा करण्यास सांगितले. या मंदिरामुळे संपूर्ण गावात सुख-शांतीचे वातावरण असून हे मंदिर त्यांचे रक्षण करते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.
संबंधित बातम्या